मैत्री म्हणजे काय? काही आठवणी विसरता येत नाहीत,काही नाती तोडता ही येत नाही,माणसं दुरावली तरी मने नाही दुरावत,चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत ,तुम्ही कितीही लांब असाल तरीही त्यांना भेटायची ओढ नाही थांबत.मैत्री कधी जात-पात ,धर्म , भाषा ,गरिबी नाही बघत ती एकदम निस्वार्थी असते.ह्या जगात एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल ,थोड्या वेळासाठी का होईना मैत्री केलीच जाते.शरीरात रक्त नसले तरी चालेल पण आयुष्यात मैत्री मात्र हवीच.कितीही जुनी झाली ना तरीही प्रत्येक वेळेस नवी नवी भासते ती मैत्री असते.आपण आपल्या रक्ताच्या नात्याला एवढं जावंच समजत नाही त्या पेक्षाही जाच आपला विश्वास आपला मैत्री वर असतो नाही का!!!
ते म्हणतात ना:-
रोज आठवण यावी असेही काही नाही,
रोज भेट घ्यावी असेही काही नाही।
मी तुम्हाला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुम्हाला याची खात्री आहे यालाच तर मैत्री म्हणतात।
मैत्री ना जोडायची ना तोडायची असते ती फक्त जपायची असते. प्रत्येकाच्या मैत्रीत त्यांना एक ना एक खूप मस्ती करणारा आणि खोड्या करणारा असतोच आणि तो असलाच पाहिजे.मैत्री ही निःस्वार्थ ,प्रेमळ ,सत्यावचिक, आणि विश्वासू असावी. मैत्री खरी असेल ना तर त्याला कोणत्याच पुराव्याची गरज नसते आणि जिथे मैत्रीचा पुरावा द्यावा लागतो ना तिथे मैत्री ही फक्त नावापुरता असते.आज काल मैत्रीची व्याख्याच बदलली आहे.जो मदत करेल ,ज्याच्याकडून आपलं काही काम होईल तो आपला मित्र ,असे मित्र फक्त समोर असतांना गोड असतात.खरा मित्र तो असतो जो तोंडावर खरं के असेल ते बोलेल,तुमचं काही चांगलं झालं तर तो स्वतः जगाला ओरडून सांगेल,करण त्याच्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच झालेला नसतो .मित्र निवडताना खूप हुशारीने निवडा........
मैत्री असायलाच हवी .....त्या शिवाय आयुष्यात मज्जा नाही....
मैत्री .....☺️☺️
धन्यवाद